डिजिटल मिडिया परिषदेच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ : जिल्हाध्यक्ष विजयकुमार बाबर

shivrajya patra

सोलापूर : मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेचे सदस्य नोंदणी अभियान राज्यभरात राबविले जात आहे. आपल्या जिल्ह्यातही या सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ केला जात असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व यु ट्यूब चॅनल चे व पोर्टल चे संपादक व पत्रकार यांनी यात सहभाग घेऊन आपली सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार बाबर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केलं आहे.

महाराष्ट्र राज्यातील बीड, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर,परभणी, बुलढाणा, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, गडचिरोली, लातूर, नांदेड, रायगड, आहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरसह अन्य जिल्ह्यात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार तसेच विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, राज्य अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली व डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या सुचनेनुसार त्याचबरोबर राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे, राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर, प्रदेश सदस्य अनिल धुपदळे, तानाजी जाधव, जितेंद्र सिरसाठ, अफताब शेख यांच्या सहकार्याने हे सदस्य नोंदणी अभियान युद्धपातळीवर राबविले जात आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यातही सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली जाणार आहे.

आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व यु ट्यूब चॅनल चे तसेच पोर्टल चे संपादक, उपसंपादक, पत्रकार यांनी या सदस्य नोंदणी अभियानात सहभागी होऊन आपली नोंदणी करावी. भविष्यात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली यु ट्यूब चॅनल चे व पोर्टल च्या विविध प्रश्नांसाठी लढा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. 

त्यासाठी आपल्याला सदस्य नोंदणी फार्म भरणे आवश्यक आहे. या सदस्य नोंदणी अभियानात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहनही जिल्हाध्यक्ष बाबर यांनी केले आहे.

To Top