गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताहास होणार प्रारंभ; हरिनाम सप्ताहाचे यंदाच 51 वं वर्ष

shivrajya patra

तुळजापूर : तालुक्यातील तामलवाडी येथे चैत्र शुद्ध 1 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार असून, यंदा या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 51 वे वर्षे आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी या अखंड सप्ताहाचा लाभ घेण्याचं आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले

संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज वै. सद्गुरू सोपानकाका महाराज देहुकर, वै. श्रीगुरु ज्ञानेश्‍वर (माऊली) महाराज देहुकर यांच्या कृपाशीर्वादाने श्रीगुरु बापुसाहेब महाराज देहुकर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीगुरु कान्होबा महाराज देहुकर यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तामलवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. मागील वर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने मोठ्या भक्तिभावाने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. 

यंदा चैत्र शु. 1, वार रविवार रोजी सकाळी गाथापुजन करुन सप्ताहास प्रारंभ करण्यात येणार असून, सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 10 गाथा पारायण, 10.30 ते 12.30 गाथा भजन, दुपारी 3 ते 5 गाथा पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन, व रात्री 8 ते 10 संकीर्तन सेवा होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह.भ.प. विनायक पाटील महाराज, ह.भ.प. अंगद चुंगे महाराज, ह.भ.प. पंढरी पाटील महाराज, ह.भ.प. शाम जोशी महाराज, ह.भ.प. सचिन जोशी महाराज, ह.भ.प. दत्तात्रय क्षीरसागर महाराज यांची प्रवचन सेवा होणार आहे तर श्रीगुरु हरिप्रसाद महाराज देहुकर, श्रीगुरु चैतन्य महाराज देहुकर, श्रीगुरु बापुसाहेब महाराज देहुकर मळोलीकर, श्रीगुरू भानुप्रसाद महाराज देहुकर, श्रीगुरु महेश महाराज देहुकर, श्रीगुरु कान्होबा महाराज देहुकर यांची संकीर्तन सेवा होणार आहे. श्रीगुरु बापुसाहेब महाराज (अण्णासाहेब)देहुकर यांची काल्याची संकीर्तन सेवा होईल व दिंडी नगरप्रदक्षिणा होऊन सप्ताहाची सांगता होईल. 

या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गावातील सहदेव विभुते, वसंत घोटकर, विलास शिंदे, शंकर सुधाकर घोटकर, सुनिल माळी, हणमंत पाटील, पत्रकार अविनाश गायकवाड यांच्या वतीने वारकर्‍यांची अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे, तर गणेश चेंडके, विश्‍वंभर घोटकर, संतोष शिंदे, रामदास गडगडे, रवी राजकुमार पाटील, अर्जुन लोंढे, त्र्यंबक दिक्षीत, शिवदास पाटील, बाळासाहेब पाटील, यशवंत लोंढे, डॉ. रविराज गायकवाड व दत्तात्रय वडणे हे अन्नदाते वारकर्‍यांसाठी अन्नदान करणार आहेत. तसेच सप्ताहातील संपूर्ण चहापानाची व्यवस्था अप्पुराजे भोसले यांच्यावतीने करण्यात येणार आहे. 

To Top