मोहोळ/यासीन अत्तार : फायनान्सचे दिलेले पैसे दिलेल्या माणसानं ते न दिल्याच्या कारणावरून संतोष आत्माराम शिरसकर (वय-52 वर्षे) यांनी गळफासानं आत्महत्या केलीय. ही घटना मोहोळ रेल्वे स्टेशन परिसरात नगरे यांच्या मळ्यात गुरुवारी, सकाळपूर्वी घडलीय. या आत्महत्येमागे फायनान्सच्या पैशाचं कारण असल्याचे त्यांच्या खिशात आढळलेल्या 'चिठ्ठी' वरून पुढं आल्याचे पोलीस दफ्तरी नोंद असल्याचं सांगण्यात आलंय.
मोहोळ येथील क्रांतिनगरातील रहिवासी, संतोष आत्माराम शिरसकर बुधवारी, 12 मार्च रोजी सकाळी बँकेत जाऊन येतो, असं घरी सांगून गेले होते, परंतु ते सायंकाळपर्यंत घरी न आल्याने मोहोळ परिसर तसेच सर्व नातेवाईकांकडे शोधाशोध केली, मात्र ते कुठेच मिळून आले नाहीत. त्यानंतर गुरुवारी, सकाळी 08/00 वा. सुमारास आम्ही त्यांचा शोध घेत असताना, मोहोळ रेल्वे स्टेशन परिसरात नगरे यांचे मळ्यात ते चिकूच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसले.
त्यांच्या नातेवाईकांनी अन्य लोकांच्या मदतीने त्यांना खाली घेतले, त्यावेळी त्यांच्या पँटच्या खिशात आधार कार्ड, पॅन कार्ड व एक चिठ्ठी मिळाली, त्यात बजाज फायनान्सचे पैसे सिताराम कोळी यास दिलेले आहेत. वगैरे मजकुराचा आशय असल्याचे दिसून आले. ही आत्महत्येची घटना फायनान्सच्या पैशाच्या कारणावरून झाली असल्याचा उलगडा झाला. त्यानंतर नातेवाईकांनी मोहोळ पोलीस ठाण्यास कळवून, त्यांना ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापुर्वीच ते मयत झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी पवन बापू शिरसकर याने दिलेला जवाब आणि डॉक्टरांच्या मृतासंबंधीच्या अभिप्रायानुसार मोहोळ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झालीय. पोहेकॉ/1650 थिटे याचा पुढील तपास करीत आहेत.