सोलापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शाखेच्या वतीने होळी पौर्णिमा निमित्त गुरुवारी ' होळी करा लहान, पोळी करा दान ' हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात 1 हजार पोळ्या समितीच्या वतीने संकलित करण्यात आल्या.त्या गोरगरिबांना देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
भारतात दरवर्षी होळी सणाला हजारो क्विंटल लाकडे जाळली जातात. लाकडांची किंमत कोट्यावधींच्या घरात असते. यामुळे आपली राष्ट्रीय संपत्ती आणि ऊर्जा साधने खूप मोठ्या प्रमाणात वाया जातात, इतकेच नव्हे तर त्यामुळे खूप मोठे वायू प्रदूषण होते.
हे टाळण्यासाठी आपण होळी अगदी छोटीशी व झाडांचा वाळलेला पाला-पाचोळा वापरून करावी. होळीचा नैवेद्य म्हणून पुरणपोळी टाकण्यापेक्षा गरिबीमुळे उपाशीपोटी जगणाऱ्यांना पुरणपोळी दान करणे जास्त हितकारक आहे, असंही अंनिस सदस्य डॉ. अस्मिता बालगांवकर आणि विजय कुंदन जाधव यांनी यावेळी सांगितलं.