सोलापूर : सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती विद्यालयात बुधवारी, १९ मार्च रोजी शैक्षणिक रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्या पद्धतीने रंग आपले जीवन आकर्षक बनवितात, त्या पद्धतीने शैक्षणिक रंग जीवन समृद्ध करतात, ही गोष्ट लक्षात घेऊन विद्यालयांमध्ये शैक्षणिक रंगपंचमी चे आयोजन करण्यात आले.
या नावीन्यपूर्ण उपक्रमामध्ये इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक विषय देऊन त्यांच्यामध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण करणे हा उद्देश बाळगून विद्यार्थ्यांना आशावाद व शिक्षणाविषयी प्रेम निर्माण करण्यात आलं.
यामध्ये विद्यार्थ्यांना चित्रकला, ठसे काम कोलाज काम, तसेच वैज्ञानिक रांगोळी, सामाजिक समस्या, पर्यावरण, मनोरंजनात्मक चित्रे अशा विविध विषयावर स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध कलाविष्कारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने मोहित केली.
या नाविन्यपूर्ण उपक्रमास सहशिक्षिका सौ. तरन्नुम शेख यांची कल्पकता व सदर उपक्रमास सौ. मुडके मॅडम व सौ. मिरकले मॅडम व गायकवाड सर व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक रिजवान शेख यांचं मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाचा चित्राविष्कार पाहण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.