सोलापूर : घरफोडीच्या गुन्ह्यातील तपासात डी. बी. पथकास मिळालेल्या माहितीनुसार पथकानं एका संशयितास ताब्यात घेतले. त्याच्या झाडा-झडतीत त्यांनं गुन्ह्याची कबुली दिलीय. राजकुमार पंडीत विभुते (वय- ४३ वर्षे, रा-बोरामणी) असं सराईत चोरट्याचं नाव आहे. त्याच्या ताब्यातून ०१, १०, ००० रूपयांचे दागिणे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शेळगी परिसरातील बलदवा नगरातील रहिवासी प्रताप शिवानंद माड्याळ यांनी, त्यांच्या घरातील अज्ञात चोरट्याने २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे दाखल केली. गतवर्षी २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान ही घटना घडली.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने डी. बी. पथकातील पोहेकॉ/१६८५ आरेनवरु यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्रीकरीता एक इसम येणार असल्याची माहिती मिळाली होती. सपोनि महाडीक व डी. बी. पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्यातील आरोपी राजकुमार पंडीत विभुते यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करुन त्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागीने जप्त केले.
त्यात ७५,००० रुपयांचे तीन जोडी सोन्याचे धातुचे कानातले १५ ग्रॅम वजनाचे, २५,००० रुपयांचे एक सोन्याच्या धातुची ०५ ग्रॅम वजनाची बिलवरी अंगठी, १०,०००रुपयांचे चार सोन्याचे धातुचे लहान मुलांचे एकुण ०२ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या असा एकूण १,१०,००० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-१) प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोनि/शबनम शेख (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि पडसळकर, सपोनि महाडिक, पो.हे.कॉ. खाजप्पा आरेनवरु, पो.हे.कॉ. शितल शिवशरण, पो.हे.कॉ. विठठल पैकेकरी, पो.कॉ. अभिजीत पवार, पो.कॉ. दत्ता मोरे, पो.कॉ. मल्लिनाथ स्वामी, पो.कॉ. बसवराज स्वामी, पो.कॉ. स्वप्नील कसगावडे, पो.कॉ. दादासाहेब सरवदे, पो.कॉ. दत्ता काटे, पो.कॉ. काळजे, पो.कॉ. थिटे यांनी पार पाडली.