०२ मुलांसह महिला बेपत्ता

shivrajya patra

सोलापूर : येथील मोची हौसिंग सोसायटीतील २९ वर्षीय विवाहिता ०२ मुलांसह कोणालाही काही एक न सांगता निघून गेलीय. ती अद्यापपर्यत परत आली नसल्याने तिचा पती रवि भास्कर म्हैत्रे यांनं खबर दिल्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात बेपत्ता रजिस्टरी दाखल करण्यात आलंय.

घरात कोणास काही न सांगता घराबाहेर पडलेल्या महिलेचं नांव पिंकी रवि म्हेत्रे असं आहे. तिच्या समवेत एक मुलगा आणि मुलगी आहे. तिची उंची ५ फुट ३ इंच,शरीर बांधा मध्यम, रंग-काळा सावळा, नाक-पसरट, चेहरा-गोल, अंगावर नेसणेस पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, मराठी, हिंदी भाषा बोलता येतात. तिच्या जवळ मोबाईल फोन नाही, असं सांगण्यात आलंय.

या बेपत्ता महिलेसंबंधी काही माहिती उपलब्ध झाल्यास वा ती आढळल्यास सदर बझार पोलीस ठाणेस (०२१७/२७४४६४१) व तपासी अमंलदार पोहवा/१२०६ पी. व्ही. गायकवाड (मो. क्र. ७७३८१४५३३६) यांना कळविण्याचं आवाहन करण्यात आलंय.

To Top