रोटरी क्लबच्या 'व्होकेशन अॅवार्डस्' पुरस्कारांचे वितरण

shivrajya patra

सोलापूर : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थने 'व्होकेशन अॅवार्डस्' ने स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. सोलापूर पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुधीर खिराडकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

सहायक आयुक्त सुधीर खिराडकर यांच्या हस्ते डॉ. विजय आठवले (प्राचार्य), डॉ. मोहिनी तकते (जिम्नॅस्टिक आणि फिटनेस कोच), गोविंद झंवर (बाबू मिशन), आशिष जवळकर- (सामाजिक कार्य), सुनीता दळवी (बचत गट) आणि प्रज्ञा कांबळे (परिचारिका) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास रोटरीच्या अध्यक्षा जान्हवी माखीजा, डॉ. सचिन जम्मा, सुनील दावडा, दीपक आहुजा, दीपक आर्वे, बळीराम पावडे, डॉ. बाळासाहेब शितोळे, मुकेश मेहता, दौलत सीताफळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

To Top