राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने दावत ए इफ्तार; विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी

shivrajya patra

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वतीने रविवारी, २२ मार्च रोजी दावत ए इफ्तार आयोजित करण्यात आले होते. या इफ्तार कार्यक्रमास राजकीय, शैक्षणिक क्षेत्राबरोबर अन्य क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

या कार्यक्रमास राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक, आमदार पंकज भुजबळ, आवाज पार्थ पवार, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष जलालोद्दीन सय्यद, प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नाईकवाडी, नजीब मुल्ला, मौलाना आझाद महामंडळ चे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग, शहराध्यक्ष संतोष पवार( सोलापूर), अल्पसंख्यांक राष्ट्रीय सरचिटणीस फारूक मटके, प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान, सोलापूर जिल्हा अध्यक्ष नजीर इनामदार, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख, बाबा सालार, नय्यूम सालार, बाबू पैलवान अड्डेवाले, डॉ. सुभान शेख, तसेच शिक्षण व इतर क्षेत्रातील आदी मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top