रमजान ईद चे अनुषंगाने पार पडली शांतता कमिटीची बैठक; सोशल मिडियावर विशेष लक्ष
सोलापूर : शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. उत्सव साजरे करताना नियमांचे पालन करावे, योग्य बंदोबस्त नेमू, असं सांगून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बैठकीला आलेल्या उपस्थितांना रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.
रमजान ईद चे अनुषंगाने सोलापूर आयुक्तालयात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २४ मार्च रोजी सकाळी ११.०० वा. शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, आर टी ओ चे अधिकारी, महावितरण चे अधिकारी, शहर काझी प्रतिनिधी राफे, मौलाना, मीना बझार अध्यक्ष राजू कुरेशी, मकबूल मोहोळकर, शकील मौलवी, बाबा मिस्त्री, मुस्लीम बांधवांची संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित केली होती.
प्रारंभी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे यांनी प्रास्ताविकात बैठक आयोजन करण्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या आणि सुचना मांडल्या. त्यानंतर या सुचनेचे संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्या कामाची रुपरेषा पाहून समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले.
पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी, उपस्थित नागरिकांचं स्वागत करुन त्यांनी मांडलेल्या अडी-अडचणींचे निरसण केले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, सोशल मिडीयावर कोणीही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, असं आवाहनही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी केले.
या बैठकीस, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण (विभाग-१), यशवंत गवारी (विभाग-२) सुधिर खिरडकर (वाहतुक शाखा), राजन माने (गुन्हे शाखा), नियंत्रण कक्ष, तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अतिरीक्त आयुक्त श्रीमती अकुलवार, आर टी ओ, महावितरणचे अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य आणि पत्रकार बंधू उपस्थित होते.