सोलापूर : रमजान महिना हा मुस्लिम बांधवांचे पवित्र महिना आहे. या महिन्यात सामाजिक एकोपा निर्माण होण्यासाठी व समाजातील एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होता यावे, यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम झाल्यास धार्मिक व सामाजिक सलोखा शांतता अबाधित राहील, सर्व धर्मामध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसातील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी यावेळी केले.
विजापूर रोडवरील पाटील नगर येथे रविवारी सायंकाळी रमजान महिना निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद यांनी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी श्याम कदम बोलत होते.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, दिलीप निंबाळकर, शहर संघटक रमेश भंडारे, शहर उपाध्यक्ष रमेश चव्हाण, गजानन शिंदे, वैभव धुमाळ, सुनंदा घंटे, सैफन नागोरे, शाहरुख शेख, नूर सय्यद, असद नागोरे, इशरत नागोरे, शाहरुख शेख , सोहेल अन्सारी, मुज्जो कोरबू आदी उपस्थित होते.