या स्पर्धेचे उद्घाटन संगणकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. आर. एस. मेंते यांच्या हस्ते सकाळच्या सत्रात करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सोलापूर, सांगोला, मोहोळ, बार्शी, पाणीव, अकलूज व पंढरपूर येथील विविध महाविद्यालयातील संगणकशास्त्र या विषयातील २९८ पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग, पोस्टर प्रेझेंटेशन व पेपर प्रेझेंटेशनसाठी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेसाठी आर. एम. पवार, एस. एस. शाकापूरे, यू. एस. दोडमिसे व के. एस. काझी यांनी परिक्षकांचे काम पाहिले. कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संचालक डॉ. आर. एस. मेंते, डॉ. जे. डी. माशाळे, डॉ. ए. आर. शिंदे, डॉ. एस. डी. राऊत, प्रा. सी.जी. गार्डी, कु. ए. टी. चौगुले, कु. पी. एन. जावळे-पाटील, एन. एस. खमितकर, कु. ए. एस. हारके, श्रीमती एम. पी. चौड्याळ, कु. पी. ए. शिंदे, श्री व्ही. ए. कोळी, कु. ए. डी. वलेकर व कु. एम. एच. जगले, आर. बी. भोसले, एस. के. वाघमारे, एस.एच. पोटे, ए. एन. सोनकांबळे व आर. व्ही. गारमपल्ली तसेच संकुलातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रशिता मार्गम व कु. शिवानी बिटला यांनी केले तर कु. पी. एन. जावळे-पाटील यांनी आभार मानले.
या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे – प्रोग्रामिंग स्पर्धेमध्ये पदवी विभागामध्ये रुचा साळुंके, संगमेश्वर महाविद्यालय हिने प्रथम क्रमांक पटकाविला, तर अभिषेक कांबळे, के. पी. मंगळवेढेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मेघना मैले व अमोल सोलसे, हिरांचेद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
पदव्युत्तर विभागामध्ये प्रदीपकुमार पांचाळ स्वेरी कॉलेज याने प्रथम क्रमांक पटकाविला. तर सोनवले ओंकार, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ, समर्थ भंडारे, संगमेश्वर महाविद्यालय व सुमित लोहार, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये पदव्युत्तर विभागामध्ये उदय गाजुल, संगमेश्वर महाविद्यालय याने प्रथम क्रमांक पटकाविला. तर कांचन निकंबे, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ, सई अवताडे, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ, प्रदीपकुमार पांचाळ स्वेरी कॉलेज व विश्वजीत राऊत, स्वेरी कॉलेज यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये पदवी विभागामध्ये आदिती पारडे व भुमिका मगर, जी. एफ. सी. सी., अकलूज, यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर आर्यांबा कोंडाबत्तीनी व कृष्णवेणी बत्तुल, ए. आर. बुर्ला महाविद्यालय, सोलापूर, यांनी द्वितीय क्रमांक, प्रीती काळे व सायली अडसर, एस. आय. आय. टी., पाणीव यांनी तृतीय क्रमांक तर शिवप्रसाद दोर्नाळ व अक्षद बोडगाल, हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.