सोलापुरातील MAAC अनिमेशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे जागतिक पातळीवर यश
सोलापूर : ॲनिमेशन या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेकानेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधीला ओळखून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीची वाटचाल करावी. आम्ही ह्या क्षेत्रात आलो तेव्हा लोकांना पटवून सांगावे लागत असे आम्ही काय काम करतो, मात्र तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणामुळे विश्व वेगानं बदलत चालले आहे. विद्यार्थ्यांनी यातील बारकाव्यांचा अभ्यास करावा, म्हणजे या क्षेत्रात आपण तज्ञ म्हणून उदयास याल, असं प्रतिपादन अमरीश पटेल यांनी केले.
येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात MAAC ॲनिमेशन इन्स्टिट्यूट सोलापूरचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बॉलीवूड हॉलीवुड सिनेमावरती अनिमेशन आणि VFX ची पाइपलाइन सांभाळणारे अमरीश पटेल (शो लाईन प्रोड्युसर), तसेच साम्या शर्मा (झोनल सेल्स मॅनेजर MAAC, मुंबई), आणि HDFC चे श्रीराज निकते (टेरिटेरी मॅनेजर, सेल्स सोलापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
पारितोषिक वितरण सोहळ्याचा दीपप्रज्वलाने करण्यात आला. तद्नंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. नंतर सोलापुरातील MAAC चे विद्यार्थ्यांचे 24 FPS या जागतिक पातळीवरील स्पर्धेत VFX चॅलेंज या कॅटॅगरीमध्ये 5 वा क्रमांक आल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते टीममधील विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमरीश पटेल यांनी
मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गेल्या 18 वर्षांपूर्वी मी करिअरची सुरुवात ज्युनिअर मॉड्युलर म्हणून केली. नंतर त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करत करत आजच्या घडीला या क्षेत्रात शो लाईन प्रोडूसर म्हणून काम करत आहे, असं सांगून अमरीष पटेल यांनी त्यांच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
तत्पूर्वी VFX चॅलेंज स्पर्धेदरम्यान किती मेहनत घ्यावी लागली आणि विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले, याचे अनुभव स्वतः विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या.बॉलीवूड आणि हॉलीवुडमधील ॲनिमेशन, गेमिंग, VFX मध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याबद्दल इन्स्टिट्यूटचे संचालक प्रवीण लांडे यांनी मार्गदर्शन
करताना, अधिक माहितीसाठी इन्स्टिट्यूटला संपर्क साधण्याचं आवाहनही यावेळी केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमृता मोरे, प्रतीक रोडगी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केलं तर प्रतिक रोडगी यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले.