घरफोडी गुन्ह्यातील २०.९३ तोळे सोन्याचे आणि २३.२२ तोळे चांदीचे दागिने जप्त

shivrajya patra

सोलापूर : शहर गुन्हे शाखेचे स.पो.नि. संदिप पाटील आणि त्यांचं पथक सिध्देश्वर मंदिर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, गणपती घाटाजवळ एका संशयिताची विचारपूस केली असता, त्यांनं सांगितलेल्या नावाचा पुरावा देऊ शकला नाही. त्याच्याविषयी कसून चौकशी करता, तो घरफोडीच्या गुन्ह्यातील सराई चोरटा सुमारे निघाला असून त्याच्या तपासात 21 तोळे सोने आणि जवळपास 24 तोळे चांदी असा ९,४८,३१६ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.

प्रदिपकुमार रामचंद्र कोळी (वय-४५ वर्षे, रा. कवठेमहांकाळ, जि. सांगली, सद्या- बाळे ब्रिज जवळ, सोलापूर) असं त्याचं खरं नांव आहे. त्यांनं प्रारंभी स्वतःच नाव पी. एस. पाटील (कोल्हापूर) असं सांगितलं होतं. तो त्या नावाचा पुरावा देवू न शकला नाही. त्यातच तो मोबाईलदेखील वापरत नव्हता. हा प्रकार, ०१ मार्च रोजी घडला.

त्यास गुन्हे शाखा कार्यालयात आणुन, त्याच्याकडे स.पो.नि. संदिप पाटील आणि त्यांच्या पथकाने, कौशल्यपुर्वक तपासात, त्याने नोंव्हेबर-२०२३ मध्ये एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत भादंवि ४५४,४५७,३८० हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास गुन्ह्यात अटक करून, गुन्ह्यातील गेला माल हस्तगत करणेकामी त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली असता, त्याने गुन्ह्यातील २०९.३६३ ग्रॅम सोने आणि २३२.२ ग्रॅम चांदी असे सोन्या-चांदीचे दागिने काढून दिले. त्याची किंमत ०९,४८,३१६ रूपये असल्याचे सांगण्यात आलंय.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप पाटील, पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, निलोफर तांबोळी, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड चालक-फरदीन शेख, यांनी पार पाडली.

To Top