सोलापूर : ०५ जणांच्या टोळीने टेंपो रस्त्यात अडवून चालकास मारहाण करीत रोख रक्कमेसह १५ हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटला. ही खळबळजनक घटना विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवनजवळ सोमवारी पहाटे सव्वा पाच वा. च्या सुमारास घडलीय. त्या टोळीने मालवाहू टेम्पोतील सर्वांवर दहशत बसवून त्यांच्याकडील कागदपत्रे लुटून नेली. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात अज्ञात पाच आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, टेंपोचालक नवनाथ विश्वनाथ बारबोले व दौलत विठ्ठल ईरकल असे एमएच ४२ बी ९०६५ क्रमांकाचा टेंपो घेऊन जात असताना ५ अनोळखी इसमांनी तो टेंपो अडवून सचिन नागनाथ घागरे, टेंपो ड्राईव्हर नवनाथ विश्वनाथ बारबोले यांना मारहाण करून १० हजार रुपयांची रोकड आणि सुमारे ०५ हजार रूपये किंमतीचे चांदीचे ब्रासलेट, सोबतची कागदपत्रे जबरीने चोरून गेली.
सचिन नागनाथ घागरे (वय-२२ वर्षे, रा-६३/६४ अभिषेक नगर अ-अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात अज्ञात पाच आरोपीविरुध्द भा. न्या. सं. कलम ३१० (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनोळखी ५ इसमांमध्ये त्यातील एक इसमाचे वर्णन एक मुलगा उंच असून त्याने त्यांचे डोकीचे केस वाढलेले, अंगात गुलाबी टी शर्ट व जांभळा बर्मुडा घातलेला, इसम नं ०२ एक मुलाने पांढऱ्या निळ्या रंगाची टी शर्ट व निळी जीन्स पॅन्ट घातलेली अन्य तीन मुलांचे वर्णन सांगता येणार नाही, असंही फिर्यादीत म्हटलंय. पोलीस उपनिरीक्षक शिंदे या गुन्ह्याच्या अधिक तपास करीत आहेत.