09 मार्च रोजी सांगोल्यात भाविक वारकरी मंडळाचे राज्यस्तरीय वारकरी संमेलन

shivrajya patra

सोलापूर : " हेचि आम्हा करणे काम| बीज वाढवावे नाम || " या संतउक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायातील संत विचाराचे मंथन व्हावे, वारकरी संघटन व्हावे, समाज मनाला स्थिरता मिळावी, या हेतूने भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून श्री संत नामदेव महाराज 16 वे वंशज ह. भ. प. माधव महाराज नामदास (पंढरपूर) यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष) यांचे मार्गदर्शनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन, अंबिका मंदिर चौक, सांगोला येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत आणि भाविक वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष जोतिराम चांगभले यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिलीय.

रविवारी. 09 मार्च रोजी सकाळी 9.30 वा. ग्रंथ दिंडी-अंबिका मंदिर ते हॉल, स. 10.00 वा. कार्यक्रम उद्घाटन होणार असून ह. भ. प. निरंजननाथ योगीजी महाराज (संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी- प्रमुख विश्वस्त ) हे प्रथम सत्राचे अध्यक्ष असतील. 

प्रमुख अतिथी ह.भ. प. श्रीगुरु गोपाळ अण्णा वासकर महाराज (वासकर फड-पंढरपूर) असतील. तसेच प्रमुख उपस्थिती ह. भ. प. भागवत चवरे महाराज (राष्ट्रीय उपाध्यक्ष), ह. भ. प. अक्षय भोसले महाराज (प्रदेश अध्यक्ष, अध्यात्मिक आघाडी शिवसेना ) आचार्य तुषार भोसले (प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी भा. ज. पा.) आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार दिपक साळुंखे, माजी आमदार शहाजी पाटील, माजी चेतनसिंह केदार सावंत (जिल्हाध्यक्ष भा. ज. पा.), राजा माने (संस्थापक अध्यक्ष-डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र), संतोष कणसे (तहसीलदार- सांगोला), डॉ. सुधीर गवळी (मुख्याधिकारी-सांगोला नगरपरिषद सांगोला), भीमराव खणदाळे (पोलीस निरीक्षक, सांगोला ) हे असतील. 

दुपारी 2.00 वा. वारकरी मंडळ पदाधिकारी परिचय भेट, दु. 2.30 वा.महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व महिला पदाधिकारी मनोगत होऊन 4.00 वा समारोप व पसायदानाने सांगता करण्यात येणार आहे. तरी सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सतीश सावंत (उपाध्यक्ष-डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र), जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष) यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

हे संमेलन यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर माऊली भगरे (जिल्हा अध्यक्ष), बिरा बंडगर महाराज (सह जिल्हाध्यक्ष), अखिल भाविक वारकरी मंडळ सर्व पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत. 

या पत्रकार परिषदेसाठी बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव), ज्ञानेश्वर माऊली भगरे (जिल्हाध्यक्ष-पंढरपूर विभाग), महादेव दिवसे उपस्थित होते.

To Top