सोलापूर : सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती विद्यालयात शनिवारी, 08 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ अख्तरबानो शेख तसेच प्रमुख अतिथी म्हणून संगमेश्वर कॉलेजच्या फिजिक्स विभागाच्या प्रमुख माननीय प्रा. डॉ. शुभांगी श्रीधर गावंडे, बालभारती प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रिजवान शेख, विद्यालयाच्या ज्येष्ठ सहशिक्षिका मेहजबीन शेख उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली भाषणे केली. या भाषणापैकी इयत्ता चौथीचा विद्यार्थी अथर्व बुक्का यांचे भाषण अतिशय उल्लेखनीय झाले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची वेशभूषा परिधान करून उपस्थित अतिथींची मने जिंकली.
शिक्षण मनोगतात संतोष गायकवाड सर यांनी महिला दिनाची सुरुवात कधी आणि कुठून झाली याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले.