सोलापूर : एमआयडीसी रस्त्यावरील श्री जगंदबा महिला रेडीमेट ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्थेत काम करीत असलेल्या १२ बांगलादेशी घुसखोरांना बुधवारी, ०५ मार्च रोजी दुपारी ताब्यात घेण्यात आलंय. अवैध मार्गाने घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधारकार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्य करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने १२ घुसखोरांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे दाखल गुन्ह्यात गजाआड करण्यात आलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एमआयडीसीतील सुमारास श्री जगंदबा महिला रेडीमेट ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्या. सोलापूर अंध व अंपग कार्यरत असणारी सहकारी औद्योगिक संस्थेत काम करीत असलेल्या कामगारांच्या चौकशीत ते भारतीय बनावट आधार कार्ड बनवून भारतात वास्तव्य करीत असल्याचे पुढं आलंय.
१) नासीर सरकार मो. बदी उज्जमान वय-२२ वर्षे, रा- ग्राम तैगोरिया भाग राजशाही जि. नाटोर बांग्लादेश
२) मोहम्मद नजीरउल्ला इस्लाम वय-३० वर्षे रा- कौदमपल्ली जि. भोगुर बांग्लादेश
३) मोहम्मद मिजानूर रोहमन, वय-२६ वर्षे, रा- नेत्रकोना बांग्लादेश
४) बाबुमिया सुलतान वय-२५ वर्षे, रा- कोदंलपुर गोसाई राहत शरियतपुर बांग्लादेश
५) शफिक रशिद मोडल वय ३१ वर्षे, रा-ढाका बांग्लादेश
६) मोहम्मद रहुलआमीन खलील फोराजी वय-३३ वर्षे, रा-परगना पश्चिम बंगाल रावगा बांग्लादेश
७) इम्रान नुरआलम हुसेन वय-२७वर्षे, रा- कोदंलपुर गोसाई राहत शरियतपुर बांग्लादेश
८) महमद हजरतअली पोलाश वय ३१ वर्षे, रा ग्राम काजीबारा जि बोगुरगा राजशाही बांग्लादेश
९) महमद हजरतअली पोलाश वय ३१ वर्षे, रा ग्राम नारहट्टा तथा तहालून जि बुगुरा बांग्लादेश
१०) मोहम्मद सोहेल जाबेदअल्ली सरदार, वय-२२ वर्षे, रा- ढाका बांग्लादेश
११) अलाल नुरइस्लाम मियाँ वय-३५ वर्षे, रा-नॉर्थ परगना पश्चिम बंगाल
१२) मोहम्मद अलीमीन हानिफ बेफिरी, वय-२९ वर्षे, रा- नॉर्थ परगना पश्चिम बंगाल देश बांग्लादेश.
अशी अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असलेल्या बांग्लादेशी नागरिकांची नावं आहेत. बांगलादेशी घुसखोरांचं अवैधरित्या सोलापुरात वास्तव्य असल्याच्या घटनेने खळबळ उडणे स्वाभाविक आहे.
हे सर्व जण भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या वैध प्रवासी परवानगी, कागदपत्राशिवाय तसेच भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी (नोंदणी) अधिकारी यांचे लेखी परवानगीशिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधारकार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्य करीत असताना मिळून आल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्रप्रसाद वाघमारे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
अवैध मार्गाने भारतात घुसखोरी करून वास्तव्य करीत असलेल्या या 12 जणांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे जवळपास 70 हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भा. न्या. संहिता कलम ३१८ (४), ३३६ (३), ३३८, सह भारतीय पारपत्र अधि १९५० चे कलम ३ (अ), ६ (अ), सह परकीय नागरीक आदेश १९४८ चे कलम ३(१), विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ प्रमाणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक खोमणे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.