रमजान महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात व्यापारी वर्गाला द्यावी व्यावसायिक वेळेत सूट : फारूक शाब्दी

shivrajya patra

सोलापूर : रमजान ईद निमित्त सोलापुरात ऐतिहासिक असा मीना बझार भरतो. या बझारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असते, हे लक्षात घेता व्यावसायिक व नागरिकांच्या सोयीसाठी दुकाने खुली राहण्यासाठी रमजान महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात व्यापारी वर्गाला रात्री सूट द्यावी, अशी मागणी एआयएमआयएमचे राज्य कार्यकारी अध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्याकडं एका निवेदनात केलीय.

सोलापुरात ऐतिहासिक असा मीना बाजार भरतो. आजुबाजूला असलेल्या दोन-तीन जिल्ह्यासह राज्याच्या सीमावर्ती भागातील नागरिक खरेदीसाठी सोलापुरात दाखल होतात. या बझारमध्ये मोठी उलाढाल बाजारात होते. रमजान महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते.

पोलिस प्रशासनाच्या सहकार्यावरच व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येईल, अन् जनसामान्यांची सोय होईल, ही बाब लक्षात घेऊन रात्रीच्या व्यवसायिक वेळेत सूट द्यावी, अशी विनंती एमआयएमचे राज्य कार्यअध्यक्ष फारूक शाब्दी यांनी केलीय.

यावेळी माजी नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे, नदीम डोणगांवकर, एजाज बागवान, एलियास शेख, अश्फाक (मेंबर), सादिक नदाफ यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

To Top