हिंदु-मुस्लिम महिला ' सावित्रीच्या लेकींसाठी' "इफ्तार संवाद"चे आयोजन

shivrajya patra

एशिअन सेंटर आणि गाजीउद्दीन अकादमीचा संयुक्त उपक्रम

सोलापूर : परस्पर स्नेह आणि विश्वास वृद्धिंगत व्हावा, या हेतूने एशिअन सेंटर आणि गाजीउद्दीन अकादमीच्यावतीने शनिवारी, २२ मार्च रोजी सायंकाळी 5.00 वाजता मुस्लिम पाच्छा पेठेतील सोशल हायस्कूलच्या प्रांगणात हिंदू-मुस्लिम महिला सावित्रीच्या लेकींसाठी "इफ्तार संवाद" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेराज आसिफ इकबाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिलीय.

या इफ्तार कार्यक्रमात डॉ. आसमा खान यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी डॉ. अस्मिता बालगांवकर, स.पो. नि. ज्योत्स्ना भांबिष्ठे, शकुंतला सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  

या कार्यक्रमास सोलापूरातील हिंदू-मुस्लिम भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावं, असं आवाहन सरीता मोकाशी व  महेजबीन सरफराज अहमद यांनी केलं आहे.

To Top