सोलापूर : महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, यांनी संयुक्तपणे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी गृह वस्तू संच योजना असून, बांधकाम कामगारांना शासकीय गृह वस्तू मिळणारे संच, यांची घरोघरी खुले आम विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना, संघर्ष कामगार संघटना, जय हिंद कामगार संघटना, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना, आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी व प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्या टोळीची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आलीय.
सहाय्यक कामगार आयुक्त , दमानी नगर यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संच वाटप केले जाते. ही वाटप प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून याचा लाभ जीवित बांधकाम कामगारांना देण्यात येतो, मात्र असे न होता, बांधकाम कामगारांकडून सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांचे कर्मचारी मे. मफतलाल एजन्सी, कर्मचारी सुरज बोरामणीकर, वैभव रगवले, कट्टे मॅडम (जिजाऊ ऑनलाईन सर्व्हिसच्या) मालकीण, निखिल कुलकर्णी नावाचे दलाल व एजंट हे शासकीय मालाचे १५०० ते २००० रुपये दराने खुलेआम विक्री करीत असल्याचा आरोप यावेळी विष्णू कारमपुरी यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.
या शासकीय मालाची विक्री करणाऱ्या दलाल तसेच एजंट आणि ठेकेदार सुरज बोरामणीकर, वैभव रंगवले यांच्यावर कठोर कारवाई करण्याण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषींवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आलीय, अन्यथा संघटनेच्या वतीने, आपल्या कार्यालयासमोर सोमवारी, १७ मार्च रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात, अंगद जाधव , बालाजी चराटे, सुहेल शेख, बाळासाहेब हजारे, अशोक कांबळे, सुरेश उमप, स्वाती माने, मिलिंद इंगळे आदींचा समावेश होता.
फोटो ओळी
सोलापूर : बांधकाम कामगारांना शासकीय गृह वस्तू मिळणारे संच, यांची घरोघरी खुलेआम विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार शीला ओसवाल यांना देताना, विष्णू कारमपुरी, सोहेल शेख, अंगद जाधव, बालाजी चराटे, अशोक कांबळे आदी दिसत आहेत.