सोलापूर : शिवणक्लासची फी देऊन येण्याच्या निमित्ताने ४ वर्षीय मुलासोबत घराबाहेर पडलेली विवाहिता घरी परत आली नाही. हा प्रकार ६ मार्च रोजी दुपारी घडलाय. उभयतांची सर्वत्र चौकशी केल्यावर ते मिळून न आल्याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार बेपत्ता वहीत नोंद करण्यात आलीय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, देगाव परिसरातील लक्ष्मी पेठ, शेटे वस्ती मधील रहिवासी सौ. शितल खंडु जाध ही २२ वर्षीय विवाहिता शेजाऱ्यांकडे निरोप ठेऊन शिवण क्लास ची फी भरण्यासाठी गेली होती, मात्र ती घरी परतली नाही. ती घराबाहेर पडत असताना, चार वर्षीय सार्थक नावाचा मुलगा तिच्यासोबत होता.
याप्रकरणी तिचा पती खंडू मल्लीकार्जुन जाधव (वय-३० वर्ष) यांना दाखल केलेल्या तक्रारीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाणे बेपत्ता नोंदवही नोंद करण्यात आलीय. तिचा वर्ण सावळा, उंची अंदाजे ५ फूट, शिक्षण - ९ वी, भाषा-मराठी आणि अंगावर नेसणेस बदामी रंगाचा टप आणि काळ्या रंगाची पँट आहे.
सौ. शितलसोबत असलेल्या लहान मुलगा सार्थक चं, वय ०४ वर्षे, उंची सुमारे तीन फूट, रंग सावळा, अंगावर नेसणेस टी-शर्ट आणि काळी हा पॅन्ट असं वर्णन आहे.
ते कोणाला आढळल्यास व त्या संबंधी माहिती असल्यास फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दिलीप भालशंकर यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलंय.