'हर घर जल' या महत्वाकांक्षी योजनेच्या पूर्णत्वानंतरही गावात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

shivrajya patra

"गावात नळ आणि पाण्यासाठी तडफड" शिंगोरी कोकनागड चांदोरी गट ग्रामपंचायतीची अकार्यक्षमता 

भंडारा/प्रतिनिधी : जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर जल' या केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे राबविण्यात येणाऱ्या योजनेचा भाग म्हणून सिंगोरी गावात ही योजना राबविण्यात आली, गांवात 'हर घर जल' या महत्वाकांक्षी योजनेच्या पूर्णत्वानंतरही आजमितीला सिंगोरी गाव पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत आहे, गावात जे पाणी पुरवठा साधन आहे, त्याला उन्हाळ्यात पिवळसर पाणी येते तर आम्ही कोणतं पाणी प्यावं, असा सवाल गावकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.

सिंगोरी गावासाठी गांवात 'हर घर जल' या महत्वाकांक्षी योजनेच्या कामाचा प्रारंभ 30 मार्च 2023 रोजी झाला, अन् 30 मार्च 2024 रोजी काम पूर्ण झाले, असं योजनेच्या फलकावर नमूद केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणी यंत्रणेत मा. कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद भंडारा, आणि अंमलबजावणी सहाय्य करण्यासाठी वाफकोस लिमिटेड आहे. 

या योजनेतून पाण्यासाठी जलकुंभ निर्माण झाला, टाकीपासून लोकांच्या घरापर्यंत पाईपलाइन आली आहे, मात्र नळ कनेक्शन आजपर्यंत लोकांना मिळाले नाही, त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय, याकडे मात्र शासन प्रशासन लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप गावकरी करीत आहेत. 

शासनाचे लाखो रुपयांची गुंतवणूक ही कुचकामी दिसते आहे, याकडे संबंधित अधिकारी आणि विभागाचे लवकर लक्ष द्यावे, नाही तर गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन, उपोषणाची तयारी दर्शविली आहे, तसेच कोणत्याही प्रकारचा कर देणार नाही, असं गावकरी बोललं जात आहेत, गट ग्रामपंचायतीला जर आमचे समस्या निराकरण करता येत नसेल, तर त्यांनी सिंगोरी कोकनागड अशी स्वतंत्र ग्रामपंचायत द्यावी, अशी मागणी गावात जोर धरू लागली आहे.

To Top