'ऑक्टेव ' अंतर्गत शनिवारी होणार छत्रपतींच्या गडकिल्ल्यावर आधारित 'गडगर्जना' महानाट्य

shivrajya patra


सोलापूर : 'ऑक्टेव' २५ या तीन दिवसाच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमानंतर शनिवारी, 29 मार्च रोजी हरीभाई देवकरण प्रशालेच्या याच रंगमंचावर 'गडगर्जना' हे महानाट्य होणार आहे. छत्रपतींच्या शौर्यावर व पराक्रमावर आधारित या कार्यक्रमास जास्तीत-जास्त तरुणांनी उपस्थिती दर्शवून महाराजांना अभिवादन करावं, अशी विनंती सांस्कृतिक संचानलाय मुंबईचे संचालक विभीषण चवरे यांनी शुक्रवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत केली.

सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या संकल्पनेतून पूर्व भारतातील कलाकार यांनी सादर केलेल्या संस्कृती सोबतच महाराष्ट्राच्या संस्कृतिचे व इतिहासाचे दर्शन घडविणारे गडगर्जना या महानाट्याचे सादरीकरण दिनांक २९ मार्च रोजी होणार आहे. 

सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली गडगर्जना या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाचे सर्व अधिकारी स्वतः सर्व नियोजनवर लक्ष ठेऊन असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोनेरी इतिहास व वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक विभाग सदैव पुढाकार घेत असून सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असं आवाहन विभीषण चवरे यांनी यावेळी केले.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'ऑक्टेव' 25 व सोबतच 'गडगर्जना' हा कार्यक्रम चालणार आहे. पूर्वोत्तर राज्यांच्या नृत्य, कला, खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारा तब्बल 300 कलाकारांचा कार्यक्रम हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित केला आहे, त्याचा शुक्रवारी रात्री समारोप होतोय.

शनिवारी सायंकाळी 'ऑक्टेव' च्या रंगमंचावरच 'गडगर्जना' हे छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांविषयी माहिती देणारे महानाट्य व शाहिरी कार्यक्रम होणार आहे. २०० पेक्षा जास्त कलाकारांचा समावेश असलेले हे महानाट्य सायंकाळी ०६ ते ०९ या वेळेत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्याविषयी माहिती देणारे महानाट्य सादर असताना सोलापूरकरांसाठी ही ०४ दिवसांची सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी ठरणार आहे.

शिवकालीन गड किल्ले, राजांच्या मोहिमा, शिवराज्याभिषेक आदी शाहिरी आणि नाट्यमय माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे, शहर-जिल्ह्यातील नागरिकांनी या सुवर्णक्षणाचं साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं, असं विभीषण चवरे यांनी शेवटी म्हटले.

यावेळी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे उपस्थित होते.


To Top