श्री शारदा अकॅडमी राबवित असलेल्या उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य : शिवसेेना नेते प्रकाश पाटील

shivrajya patra

पडघा येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा; कवितेतून मराठीचा जागर 

भिवंडी/प्रतिनिधी : श्री शारदा अकॅडमी करीत असलेले कार्य कौतुकास्पद असून अकॅडमी राबवित असलेल्या उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन शिंदे गटाचे शिवसेेना नेते प्रकाश पाटील यांनी केले.

श्री शारदा अकॅडमी पडघे यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष व सल्लागार शंशाक तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली "विष्णू वामन शिरवाडकर" उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त भिवंडी तालुक्यातील पडघा जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रकाश पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी शारदा ॲकेडमीच्या पदाधिकारी, सदस्यांना शुभेच्छाही दिल्या. 

या कार्यक्रमास शिवसेना उबाठा गटाचे उपनेते विश्वास थळे, पडघा ग्रामपंचातीचे सरपंच रवींद्र विशे, उपसरपंच निता दास, माजी सरपंच प्रभावती जाधव, माजी उपसभापती गुरुनाथ जाधव, वृषाली विशे, डॉ. संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे यावेळी श्री शारदा अकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत तांबोळी यांनी प्रास्ताविकेत मांडले. 

श्री शारदा अकॅडमीच्या यु-ट्युब चॅनेलचे प्रकाश पाटील व विश्वास थळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच पत्रकार, मुख्याध्यापक, शिक्षक, चित्रकार, रांगोळी रेखाटणारे कलाकार, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा शाल, पुष्पगुच्छ, तुळशीचे रोप, सन्मानचिन्ह, देऊन गौरव करण्यात आला. 

यावेळी विजयकुमार भोईर, जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, ॲड. प्रज्ञेश सोनावणे, संदीप कांबळे, मिलिंद जाधव, संघरत्न घनघाव, अक्षय भोईर, ज्योती घनघाव, अनिल शेलार, कैलास म्हस्के, भगवान गायकवाड, संजय गायकवाड, शाईस्ता शेख, सायजीन शेख यांनी दर्जेदार कविता सादर केल्या. 

याप्रसंगी श्री शारदा अकॅडमीच्या अध्यक्ष सेजल तांबोळी, उपाध्यक्ष अश्विनी गायकवाड, चिटणीस मयुरी बिडवी, खजिनदार ममता शेलार, कार्याध्यक्ष उषा आगोणे, सदस्य सानीका पारधी, उज्वला जाधव, नितीशा म्हात्रे, चेतना वोळज, टी. ए. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र थोरात, शिक्षक संजय चौधरी, अनिल शेलार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमर राऊत यांनी केले.

To Top