"चॉंद ईदचा हसला ! "

shivrajya patra

 

"चॉंद ईदचा हसला ! "

"अल्लाहके सभी बंदो को ईद का चॉंद बहोत मुबारक हो! "
🌙
"चॉंद ईदचा हसला! "

आकाशात तेजोमयी
चॉंद खूपच हसला
गोड संदेश ईदचा
मज तयात दिसला ।।१।।

सांगू लागला संदेश
चॉंद सा-या घरोघरी
सहेरीस बंदे आता
उठ जरा लवकरी।।२।।

सांगतोया सकलांना
आला आता रमजान
जिंदगानी कर जरा
खुदावरी कुरबान।।३।।

फास बहू अवखळ
जगी बघ संसाराचा
रोजा,जकात,नमाज
पाया खरा जीवनाचा।। ४।।

काढ आता वेळ जरा
संगतीत अल्हाहाच्या
दूर पळुनि जातील
वेदनांही अंतरिच्या।।५।।

हसुनिया चॉंद मज
सारे सांगुनिया गेला
जाग बंदे आता जरा
माहे रमजान आला।। ६।।

जाणोनिया घ्यावे बंदे
काय खरे, काय खोटे
जगतात रब पेक्षा
कुणी नाही बघ मोठे।।७।।

जनाब मोहिद्दीन अकबर नदाफ.
तडवळे (या), ता. बार्शी, जि. सोलापूर.

शिवभार : अखिल मुस्लिम भारतीय मराठी संमेलन व्हॉटस् वालवरून !

To Top