संभाजी ब्रिगेडच्या वतीने सावंतवाडीत पार पडली रोजा इफ्तार पार्टी
सोलापूर/प्रतिनिधी : देशात हिंदू-मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकण्याचा, त्यांना दंगली करण्यासाठी प्रवृत्त केलं जाण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय. मात्र, आपण आपल्या घरातील तरुणांना त्यापासून दूर ठेवलं पाहिजे," त्यांच्या शिक्षणावर भर दिला पाहिजे. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान निमित्तानं होणारी 'इफ्तार पार्टी' म्हणजे हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक असल्याचं मनोगत संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केले.
पवित्र रमजान निमित्त राष्ट्रीय एकोपा जपण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील सावंतवाडी संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा संपर्क कार्यालयात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना, श्याम कदम बोलत होते.
शहरी भागात मोठ्या प्रमाणात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. ग्रामीण भागात ही हिंदू-मुस्लिम एकोप्यासाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करणे गरजेचे होते. त्यामुळे हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आयोजक संभाजी भोसले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होते.
यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण, दारफळ अकोले काटी, कोंडी परिसरातील मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, संपर्कप्रमुख छत्रगुण माने, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, मौलाना बुगन इनामदार, शहाजहान इनामदार, रफिक इनामदार, सुजात खां पठाण, चांद इनामदार, जिलानी मुलानी, शाहिद मुलाणी, तनिज मुकाजी, अझर मुलाणी, सलीम शेख, नासिर इनामदार, सुनिता घंटे, राजनंदिनी धुमाळ ,जयश्री जाधव, रमेश भंडारे, रमेश चव्हाण, गोवर्धन गुंड, वैभव धुमाळ, दिलीप निंबाळकर, शेखर कंटेकर, सतीश वावरे, अभिषेक जहागीरदार, सिद्धाराम सवळे, अमोल सावंत, विकास सावंत आदी उपस्थित होते.