२६ व २७ एप्रिल रोजी नागपूर येथे होणार संमेलन
पुणे : दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन दि. २६ व २७ एप्रिल २०२५ ला नागपूर येथे आयोजित करण्यात आले असून या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण तज्ञ , ज्येष्ठ साहित्यक व माजी कुलगुरु शहाबुद्दीन नुर महंमद पठाण उर्फ एस . एन . पठाण यांची निवड करण्यात आल्याची घोषणा परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ अजीज नदाफ व सचिव अय्यूब नल्लामंदू यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २४ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्षीय नावाची घोषणा करण्यात आली.
संमेलनाचे उद्घाटन विमलताई देशमुख स्मृती सभागृह धनवटे नैशनल कॉलेज, अजनी रेल्वे स्टेशन समोर नागपूर येथे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार असून संमेलन स्वागत अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. शरयु तायवाडे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्य संयोजक प्रा .जावेद पाशा कुरेशी नागपूर व प्रा. इ. जा. तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे सदस्य नागपूर येथील प्रा. डॉ. असलम बारी, अॅड. कुतुब जफर, प्रा. अॅड. रमेश पिसे, अब्दुल रऊफ शेख, प्रा. डॉ. एस. एस. पठाण, ज्ञानेश्वर रक्षक, शकील पटेल, माणिकराव खोब्रागडे, नेहा गोडघाटे, डॉ. ममता मुन, संजय गोडघाटे, अहमद कादर, ताहीरा शेख, हाजी नासीर साहेब, सुरेश मुन, प्रा. राहुल मुन, जमील अन्सारी, इम्रान फैज, रोशनी गणवीर, शिफा कुरेशी, प्रितीबाला बोरकर, सुष्णा कळमकर, रजनी संबोधी, हिफाजूर्रहमन खान, खेमराज भोयर, कलाम खान, हनिफ कुरेशी यांचा समावेश आहे. संमेलनाच्या संयोजनाची आणि कार्यक्रमाची व्यवस्था ही समिती करीत आहे.
या पत्रकार परिषदेत नूतन संमेलनअध्यक्ष एस. एन. पठाण यांचा सत्कार परिषदचे उपाध्यक्ष प्राचार्य इ. जा. तांबोळी, सचिव अय्यूब नल्लामंदू, खजिनदार हसीब अजीज नदाफ यांनी शाल, पुष्प गुच्छ, पुस्तके देऊन करण्यात आला. व त्यांच्या उपस्थितीत परिषदे चा ३५ वा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला.
अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदचे संमेलन आतापर्यंत सोलापूर, पुणे, मुंबई, रत्नागीरी, कोल्हापूर, नागपूर, नाशिक येथे झाले होते. दहावे संमेलन पुन्हा विमलताई देशमुख स्मृती सभागृह धनवटे नैशनल कॉलेज, अजनी रेल्वे स्टेशनसमोर नागपूर येथे होत आहे.
दहावे संमेलनाची नागपूर शहरात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. यासाठी भारतीय मुस्लीम परिषद, फुले शाहू आंबेडकर विचारमंच, डॉ. साहा सांस्कृतिक विचार मंच व छबी पब्लीकेशन नागपूर या संस्था कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
या संमेलनात विविध राज्यातील किमान एक हजार साहित्यिक उपस्थित राहतील, असा विश्वास उपाध्यक्ष प्राचार्य इ. जा. तांबोळी व सचिव अय्यूब नल्लामंदू यांनी व्यक्त केला आहे. तसेच संमेलनाच्या विचारपीठला नागपूरचे समिक्षक दिवंगत डॉ. अक्रम पठाण यांचे नांव देण्याचा निश्चीत झाले आहे.
नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शिक्षण तज्ञ, नऊ पुस्तकाचे लेखक व संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरचे माजी कुलगुरु व सध्या पुणे येथे स्थायिक झालेले डॉ. एस. एन. पठाण यांची निवड केंद्रीय समितीच्या बैठकीत घेण्यात आले.
केंद्रीय समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अजीज नदाफ, सचिव अय्यूब नल्लामंदू , सहसचिव मुबारक शेख आणि नागपूर संमेलनचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. जावेद पाशा कुरेशी, प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी , डॉ. फारूक शेख, हसीब नदाफ, प्राचार्य डॉ. शकील शेख, प्रा. युसूफ बेन्नूर या निवड समितीने महाराष्ट्रातील साहित्यिक तथा ज्येष्ठ विचाखवंत डॉ. एस. एन. पठाण यांचे नांव केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत सर्वानुमते १० वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड निश्चितच केली.
या वेळी परिषदचे वार्षिक अंक "मराठवाणी " व विविध साहित्यिकांनी लिहलेल्या पंधरा पुस्तकाचे व "कासिद - संमेलन विशेषांकांचे " प्रकाशन मान्यवराच्या हस्ते होणार आहे. तसेच माजी संमेलन अध्यक्षांचा गौरव ही करण्यात येणार आहे. सहा सत्रातून विविध विषयावर विविध जिल्ह्यातील वक्ते विचार मंथन करणार असून कथा कथन, मराठी कवी संमेलन, राष्ट्रीय मिला-जुला मुशायरा व फातीमांच्या लेकी हा महिलांसाठी स्वतंत्र कवीता विचारपीठ ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
मुस्लीम मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन
आज २४ मार्च २०२५ रोजी पत्रकार परिषदेत ही गोष्ट सांगताना आम्हांस अत्यंत आनंद होत आहे कि, अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन आहे.
१९९० साली याच दिवशी, म्हणजे २४ व २५ मार्च असे दोन दिवसीय पहिले साहित्य संमेलन सोलापूरात संपन्न झाले होते. याचे संस्थापक डॉ. अजीज नदाफ, मरहूम अब्दुल लतीफ नल्लामंदू, मरहूम फ. ह. बेन्नूर, मरहूम मीर इस्हाक शेख, मुबारक शेख, कै. विश्वासराव फाटे , कै. निर्मल कुमार फडकुले होते.
त्या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फकीर महंमद शहाजिंदे होते तर कवि ए. के. शेख, डॉ. इकबाल मिन्ने, खलील मोमीन, इब्राहीम अफगान, यु. आ. सिद्धीकी, कै. रंगा अण्णा वैद्य , कै. व्ही. आर. कुलकर्णी , कै. धर्मण्णा सादूल व असंख्य कार्यकर्ते यांचं विशेष सहकार्य लाभले होते.
या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष इ. जा. तांबोळी, सचिव अयूब नल्लामंदू , सहसचिव मुबारक शेख, खजिनदार हसीब नदाफ, इंतेखाब फराश यांची प्रमुख उपस्थिती होती .
फोटो : डॉ. एस. एन. पठाण यांचं अभिनंदन करताना डावीकडून कवी मुबारक शेख, हसीब नदाफ, प्रा. आय. जे. तांबोळी, इमतेखांब फराश छायाचित्रात दिसत आहेत.