(संग्राह्य छायाचित्र)
मोहोळ/विष्णू शिंदे : मागील पंधरा वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे ज्यांची जमीन ओलिताखाली येणार आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असल्याचे आमदार खरे यांनी नुकतंच सांगितलंय.
राजू खरे हे आमदार झाल्यापासून शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नासाठी ते सातत्याने लढत आहेत. आष्टी उपसा योजनेचे काम प्रलंबित राहिलेले आहे या कामाला गती यावी, शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली याव्या शेतकऱ्याचं भविष्य सुजलाम् सुफलाम् व्हावा, या उद्देशाने आमदार राजू खरे हेच आता त्यासाठी प्रयत्नशील आहेत. आष्टी उपसा सिंचन योजना प्रश्नाबाबत ते सातत्याने पाठपुरावा करत होते, पाटबंधारे मंत्री विखे-पाटील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सर्वश्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडे या सिंचन योजनेसाठी सातत्यानं पाठपुरावा केला जात होता.
याप्रश्नी अधिकारी वर्गाची उदासीनता पदोपदी जाणवते, यासंबंधी अधिकारी बैठक लावण्यासाठी अनत्सुक होते, त्यांच्या मनामध्ये अप्रत्यक्षरित्या भय आणि दहशत होती. यामुळे या प्रश्नाबाबत ते बोलत नव्हते, असं आमदार खरे यांचं म्हणणं आहे.
या सर्व बाबी अजित दादांच्या कानावर घातलेल्या आहेत. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी अधिकाऱ्यांची शेटफळ येथे बैठक लावण्यात आली होती. ही बैठक जवळजवळ ४ तास चालली. अधिकाऱ्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मला पोलीस बंदोबस्त मागवावा लागला होता. हे सर्व अधिकाऱ्यांनी आणि तेथील ग्रामस्थांनी पाहिलं आहे, तेव्हा ही बैठक पार पडली, असं आमदार राजू खरे सांगितले.
या बैठकीनंतर २२, फेब्रुवारी रोजी मी संबंधित मंत्र्यांना या योजनेसाठी ६० कोटींचा निधी या योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठी आवश्यक असून तो मंजूर करण्याबाबत पत्र दिले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत १० वेळा बैठका झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेच्या निधी मंजुरीबाबत ग्रीन सिग्नल दिला. यावेळी पाटबंधारे खात्याचे सचिव कपूर, तसेच मंत्री विखे पाटील, अजित पवार, एकनाथ शिंदे या सर्वांच्या सहकार्याने १५ वर्षापासून प्रलंबित असणारा हा आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असंही आमदार खरे यांनी म्हटलंय.