सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अधिवास असणाऱ्या अविवाहीत पुरुष उमेदवारांनी अग्निपथ योजनेअंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी अग्निवीर प्रवेशासाठी निवड चाचणीसाठी १० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केलं आहे.
प्रवेशासाठी https://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची प्रवेश परीक्षा जून २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पात्र व इच्छूक नवयुवकांनी सदर संधीचा फायदा घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी असे आवाहनही केले आहे.