बसव ब्रिगेडतर्फे सोमवारी 'पत्र मोहिमे' चा शुभारंभ
सोलापूर : सोलापूरचे स्वाभिमानबिंदू ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिराच्या ईशान्येकडील प्रवेशद्वार शेजारील शौचालय तातडीने हटविण्याच्या मागणीचे पत्र 1 लाख सिद्धेश्वर भक्त आयुक्तांना धाडणार असल्याची माहिती बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे यांनी दिली.
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिराच्या लक्ष्मी मार्केट समोरील प्रवेशद्वारालगत असलेले शौचालय हटविण्याबाबतची मागणी मागील अनेक वर्षांपासून शहर जिल्ह्यातील सिद्धेश्वर भक्त, सामाजिक धार्मिक संघटना व महिला मंडळांनी महापालिका प्रशासनाकडे व्यक्त केलीय, मात्र याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्यामुळे हे अभिनव आंदोलन छेडण्याची वेळ आली असल्याचे रोडगे यांनी म्हटलंय.
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर हे प्रत्येक सोलापूरकराचे श्रद्धास्थान असून हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेचे महत्व लक्षात घेता, ईशान्य दिशेला पवित्र स्थान मानले जाते, परंतु श्री सिद्धेश्वर महाराज मंदिराच्या ईशान्येकडील प्रवेशद्वारालगत महापालिकेने शौचालय बांधून मंदिराच्या पावित्र्यास धोका निर्माण केला आहे. त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
तेव्हा आम्हा श्री सिद्धेश्वर महाराज भक्त मंडळींच्या भावना लक्षात घेऊन सदरचे शौचालय तातडीने हटवण्यात यावे, अशा पद्धतीच्या मागणीचे पत्र 1 लाख सिद्धेश्वर भक्तांच्या नाव, मोबाईल नंबर व स्वाक्षरीसह बसव ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शिवराज विभूते यांच्या संकल्पनेतून देण्यात येणार आहे. या पत्र मोहिमेचा शुभारंभ सोमवारी, 10 मार्च रोजी श्री सिद्धेश्वर मंदिरात करण्यात येणार आहे.
या पत्र मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन बसव ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी करिता
शिवराज विभूते-7249444474,
अमित रोडगे-8330902112,
बसवराज चाकाई-9096452116,
जतिन निमगाव-9226341208
या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बसव ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलं आहे.