सोलापूर : कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय कुमठे येथे जागतिक महिला दिन शनिवारी, ०८ मार्च रोजी साजरा करण्यात आला. प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्र विकास प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मंगला नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त कुमठे प्रशालेच्या सहशिक्षिका सौ. रूपाली खाडे व राष्ट्र विकासच्या विद्या मंदिरच्या सहशिक्षिका सौ. कांचन कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. प्रशालेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमठे प्रशालेच्या सहशिक्षिका सौ. कुडले यांनी केले, तर सौ. जमखंडीकर मॅडम यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.