सोलापूर : जागतिक महिला दिनी, संभाजी ब्रिगेडच्या वतीने समाजाच्या मुख्य प्रवाहातून वंचित असलेल्या घटकातील श्रमकरी-कष्टकरी महिलांचा सन्मान केला जातो, यावर्षी सुद्धा चाळीस वर्षापासून सिद्धेश्वर मंदिरासमोरील फुटपाथवरील पालावर सेवाभावी वृत्तीने गोरगरिबांसाठी अत्यल्प कमी दरामध्ये भोजन उपलब्ध करून देऊन आपल्या संसाराचा गाडा स्वाभिमानाने हाकणाऱ्या महिलांचा मानाचा फेटा सन्मानचिन्ह व मिठाई देऊन त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा शनिवारी महिला दिनी सन्मान करण्यात आला.
महिला दिनी सर्वत्र उच्चशिक्षित, उच्चपदस्थ अधिकारी व अन्यवेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व सन्माननिय महिलांचा सन्मान या दिवशी केला जातो, मात्र संभाजी ब्रिगेड च्या वतीने वीट भट्टीवरील कामगार महिला, कचरा वेचणाऱ्या महिला, भाजी विक्रेत्या महिला, सफाई कामगार महिला, अशांचा सन्मान करण्यात येतो. जेथे स्त्रीचे सन्मान होतो, तेथे समाजाची प्रगती होते, या भावनेतून हा सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, संपर्कप्रमुख छत्रगुण माने, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, सिद्धाराम सवयगी, सतीश वावरे, दिलीप निंबाळकर, गजानन शिंदे, संतोष सुरवसे, यशवंत लोंढे, गौरीशंकर वरपे, रमेश भंडारे, सुमित मंद्रुपकर, मल्लिकार्जुन शेवगार, श्रवण साळुंके, बबन डिंगणे, प्रेम भोसले, महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, माधुरी चव्हाण, संजीवनी सलबत्ते, जयश्री जाधव, अश्विनी पाटील, सुनिता घंटे आदी उपस्थित होते.