स्वराज सप्ताहात MPSC उत्तीर्ण भोजने भगिनींचा राष्ट्रवादीकडून सन्मान

shivrajya patra

राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे यांचा स्तुत्य उपक्रम

सरोजिनी व संजीवनी या दोघींना प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची 11000 रूपयांची भेट

सोलापूर : सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या सरोजिनी व संजीवनी ज्योती दादा भोजने यांना भगवे फेटे बांधून करून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती शिवविचारांचे पुस्तक देऊन शनिवारी सन्मान करण्यात आला. शिव विचार मना–मनात, घरा-घरात हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन हा विशेष सन्मान करण्यात आला.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी  महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणांनी राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून गेले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून शिवजयंती निमित्त स्वराज सप्ताह चे आयोजन करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सत्कार मूर्तींनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाने आमच्या यशाची दखल घेऊन आमचा गौरव केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावरील मान्यवर माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे यांनी त्यांच्या भाषणात सरोजिनी आणि संजीवनी भोजने यांनी MPSC परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.

तद्नंतर प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांच्या भाषणात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संकटांवर मात करीत भोजने कुटुंबियांच्या दोन्ही मुलींनी MPSC परीक्षेत यश संपादन करून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला. या यशाबद्दल  वैयक्तिक ११ हजारांची स्कॉलरशीप आर्थिक सहकार्य सन्मान स्वरूपात भेट दिली. सरोजिनी व संजीवनी यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घ्यावा, असं आवाहन केले. त्यांनी वैभव गंगणे यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे यावेळी विशेष कौतुक केले.

जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर सरोजिनी व संजीवनी यांनी आजच्या पिढीसमोर अनोखा आदर्श प्रस्थापित केल्याचं आपल्या शुभेच्छापर मनोगतात म्हटले.

याप्रसंगी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, जेष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महेश निकंबे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल, युवक अध्यक्ष सुहास कदम, संघटक दत्तात्रय बडगंची, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष महेश वसगडेकर, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, अयुब शेख, अर्चना दुलंगे, शाहीन शेख यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आयुष लोकरे यांनी तर शिव आभार वैभव गंगणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदन मुळे यांनी अथक परिश्रम घेतले.

To Top