शकील शेख यांनी ए आय एम आय एम च्या शहराध्यक्षपदी काम केलंय, त्यांचं सामाजिक क्षेत्रात कार्य आहे. कामगार चळवळीत देखील त्यांनी काम केले आहे. त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश करून राष्ट्रवादीचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवून अल्पसंख्यांक समाजातील प्रश्न शासन स्तरावर सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे अजित सोबत आलो आहे, असे सांगत अल्पसंख्यांक समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार मार्ग काढून सोडवू शकतात, असा विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन शकील शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचं सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षात मनपूर्वक स्वागत करतो, ते पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन मजबूत करतील, असा विश्वास व्यक्त करतो, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे आणि पक्षातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आपण पक्षाचे काम करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले.
पक्ष प्रवेशानंतर शकील शेख यांची सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी तर दत्तात्रय बनसोडे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. उभयतांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख, सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी, वाहतूक विभाग अध्यक्ष इरफान शेख, सोशल मिडीया अध्यक्ष वैभव गंगणे, प्राजक्ता बागल, मोबीन शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
