जीवन एक रंगमंच आहे : प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी

shivrajya patra

नाटकात काम करण्यासाठी जिगर लागते - शेख

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य परिषद व सोशल महाविद्यालय आयोजित नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

सोलापूर : जीवन म्हणजे एक रंगमच आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत दुनियेच्या या रंगमंचावर आपल्याला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. आयुष्यात सुख-दु:ख येत असतात, त्याला आपण धैर्याने सामोरं जात सुखी जीवन जगले पाहिजे, असं प्रतिपादन सोलापूर सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य इ. जा. तांबोळी यांनी केले. 

येथील सोशल महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदच्या संयुक्त विद्यमाने उर्दू घर येथे एक दिवसीय नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून मुदस्सर इलियास शेख, इम्तियाज मालदार, अय्यूब नल्लामंदू, साहीर नदाफ, इक्बाल बागबान तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी होते. 

सोलापूर सोशल महाविद्यालय,उर्दू विभाग प्रमुख प्रा. डॉ. शफी चोबदार यांनी कार्यक्रमाचे महत्व विषद केले तर प्रा. डॉ. गौस शेख, राजा बागबान यांनी सर्व अतिथींचं शालबुके देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इलियास मुदस्सर शेख यांनी मार्गदर्शन करत म्हणाले, जीवनात नाटकाचे खूप महत्व आहे, नाटकात काम करणे, दिग्दर्शन करणे हे धाडसाचं चा काम आहे. नाटक हे नाटक नसतो तर समाज प्रबोधनाचे माध्यम आहे, म्हणून या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम करत रहावे, असे आवाहन केले. 

त्यानंतर ज्येष्ठ रंगकर्मी राजा बागबान म्हणाले, नाटकात समाजाचे चित्रण सादर सादर करताना काळजीपूर्वक कार्य करावे, कारण नाटक हे समाजाला एक नवीन दिशा देत असतो.

त्यानंतर उर्दू मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब नल्लामंदू यांनी मार्गदर्शन करत म्हणाले, नाटक लिहिताना अनेक पैलूवर चर्चा करून, ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन लिहीत राहाल, तरच तुम्ही एक उत्तम नाट्य लेखक व्हाल. आजच्या नाट्य प्रशिक्षणातून चांगले लेखक, कलाकार घडतील, अशी अपेक्षा ही अय्युब नल्लानंदू यांनी व्यक्त केली.

नाट्य प्रशिक्षक इम्तियाज मालदार यांनी दोन सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नाटकाच्या विविध पैलूवर भाष्य केले. नाटक म्हणजे काय? नाटकाचे विविध प्रकार, दिग्दर्शन, नेपथ्य संगीत, सूत्रसंचालन या विविध विषयावर माहिती दिली. नाटकातील विविध गमतीदार किस्से सांगत हसविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौस शेख यांनी केलं तर डॉ. कदीर बिजापुरे यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.

To Top