उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त युवासेना शहरप्रमुख समर्थ मोटे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी जेष्ठ महिलांनी व नागरिकांनी उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. 

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या अध्यक्षेखाली, जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, मनोज  शेजवाल, बालयोगी अविनाश महाराज, उमेश गायकवाड, हरी चौगुले, तुकाराम मस्के, सोमेश क्षीरसागर, मुन्ना साठे, संजय सरवदे, नवनाथ चव्हाण, सुजीत खुर्द, सुनील निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी शहर परिसरातील असंख्य जेष्ठ नागरिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी जयश्री पवार, योगेश जाधव, अशोक चौन्डे, पूजा चव्हाण, सुनंदा साळुंके, मनीषा नलावडे, मारता आसादे, शशिकला कस्पटे, अनिता गवळी, अश्विनी भोसले, प्रमोद चिकणे, त्रिगुण पवार, स्वप्नील खरात, संमेत सावळे, बालाजी नायकोडे, सचिन कदम, यांच्यासह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

To Top