सोलापूर : होटगी रोड, इंडस्ट्रियल इस्टेट येथील रहिवासी हुकुमचंद शंकरराव कंडारकर सोमवारी, 10 फेब्रुवारी रोजी रात्री राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते मृत्यूसमयी ८२ वर्षीय होते.
त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता होटगी रोड इंडस्ट्रीयल इस्टेट येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता मोदी स्मशानभूमी येथील विद्युत दाहिनी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. मायक्रो चेक कंपनीचे मालक हर्षवर्धन कंडारकर यांचे ते वडील होत.