सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती साजरी करणारं पहिलं मंडळ म्हणून ज्या मंडळाचा प्रामुख्यानं उल्लेख होतो, त्या शिवालय सामाजिक संस्थेचे संस्थापक प्रकाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवजन्मोत्सव उत्सव अध्यक्ष पदी हरिश सिध्दे यांची निवड करण्यात आली.
माजी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, उद्योजक प्रमोद मोरे, सुखदेव शिंदे, कार्यकारी अभियंता नवनाथ चव्हाण, शशी थोरात, राम गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यंदाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष हरिश सिध्दे, कार्याध्यक्ष शुभम नीळ, रोहन म्हमाणे, उपाध्यक्ष अभिजित शिंदे, राहुल भोसले, सेक्रेटरी रमाकांत ताटे, सहसेक्रेटरी स्वराज्य चव्हाण, खजिनदार प्रशांत बिराजदार, रितेश कदम, लेझीम प्रमुख शिवराज कलशेट्टी, महिबूब नदाफ, गजानन कोकाटे, ॠतुज सिध्दे, मिरवणूक प्रमुख रोहन काटे, विनायक कटके, पुजा प्रमुख स्वप्निल कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख आकाश फुलसे यांची निवड करण्यात आली.
शिवजयंती दिनी, १९ फेब्रुवारी रोजी चारशे मावळ्यांची लयबद्ध लेझीम ने मिरवणूकीने सांगता होईल, असंही यावेळी सांगण्यात आलंय.