॥ निधन वार्ता॥ द्राक्ष बागायतदार महासंघाचे माजी अध्यक्ष कुंडलीक माने यांचं निधन

shivrajya patra

 
सोलापूर : तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे संचालक तथा पुणे द्राक्ष बागायतदार महासंघाचे माजी अध्यक्ष कुंडलीक रामराव माने यांचं गुरूवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर धोत्री इथं दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते मृत्यूसमयी ६८ वर्षीय होते.

तुळजापूर तालुक्यातील धोत्री गांव गायरान आणि माळरानाच्या कुशीत वसलेलं गांव... जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गांवचे कुंडलिक माने यांनी पुणे द्राक्ष बागायतदार महासंघाच्या अध्यक्षपदही भूषविलं. ते अप्पा या उपाध्य सर्वदूर परिचीत होते. त्यांच्याकडे विकासाचा ध्यास असलेलं व्यक्तीमत्व म्हणून पाहिलं जात होतं. बागायत क्षेत्रात गावची मान अभिमानाने ऊंचावणारे तसेच श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे संचालक म्हणूनही त्यांनी पंचक्रोशीची सेवा केली. 

अप्पांनी गावाच्या शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाच ऋण कधीही न फिटणारं असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे खजिनदार शिवाजीराव पवार, शंकरराव येणगुरे, महादेव वडणे, भैय्या शेख, यशपाल वाडकर, काशिनाथ आवताडे, पिंटू हेले, सचिव दिलीप माने, दिलीपराव चौगुले यांच्यासह कृषि, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

▪️

To Top