जागतिक महिला दिनानिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‌‘वंडर वुमन‌’ पुरस्काराने होणार गौरव

shivrajya patra

सोलापूर : सोलापुरातील म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‌‘वंडर वुमन 2025‌’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोलापुरातील मान्यवर महिलांचा यंदा सन्मान केला जाणार आहे.

यंदाच्या वर्षी पुरस्कार जाहिर झालेल्या मान्यवर महिलांंमध्ये डॉ. शोनाली वळसंगकर, डॉ. श्रद्धा पांढरे, डॉ. मोनिका उंबरदंड, डॉ. गौरी कहाते, सौ. शर्मिला शहा, सौ. श्वेता मेगेरी, ॲड. साधना संगवे, सौ. गौतमी साबळे, सौ. समर कारिगर यांचा समावेश आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, 2 मार्च रोजी सायंकाळी 6.00 वाजता जुळे सोलापुरातील होटल गोल्डन फोर्क येथे होत असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण पतसंस्थेच्या सौ. आशा हजारे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन म्युझिक आर्ट डान्स ॲकॅडमीचे अध्यक्ष सौ. असावरी गांधी, अर्टिस्ट विकास गोसावी, कोरिओग्राफर भोमिशा शहा, सोनाली वाघमोडे, डॉ. अंशु शर्मा, आदित्यविक्रम गांधी, सचिन जगताप, ॲड. मनोज गिरी यांनी केले आहे.

या सोहळ्याच्या माध्यमातून सोलापुरातील महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असून, त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. महिला सशक्तीकरणाचा उत्सव म्हणून हा सोहळा साजरा होणार असल्याचे ॲकॅडमीच्या अध्यक्षा आसावरी गांधी यांनी सांगितले.

To Top