(सर्व चित्रे : इ टीव्ही/भारत)
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी पोस्ट करुन त्यांना नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिल्याचा आरोप केला. या आरोपाला प्रशांत कोरटकर यांनी E TV/Bharat वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्टोक्ती दिलीय.
" मी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे सायबर प्रमुख यांना अर्ज करून हा खोडसाळपणा ज्यांनी केला आहे, त्याचा शोध घेण्याची विनंती करणार आहे. इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या व्यक्तीनंही शहानिशा न करता, माझ्याशी चर्चा किंवा फोन न करता थेट समाज माध्यमावर पोस्ट केली.
त्यामुळे मला सकाळपासून शेकडो धमकीचे फोन आले आहेत. या प्रकरणाची चौकशी झालीचं पाहिजे, अशी मागणी करणार आहे," असंही प्रशांत कोरटकर यांनी यावेळी म्हटलंय.

