सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते आणि जोडभावी पेठेतील जुने रहिवासी अॅडवोकेट मल्लिनाथ राचेटी यांच्या काकू शांताबाई सिद्रामप्पा राचेटी यांचे रविवारी वृद्धापकाळमुळे निधन झाले. त्या मृत्यूसमयी ८७ वर्षीय होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सात मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांची अंत्ययात्रा सोमवारी, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या जोडभावी पेठ येथील निवासस्थानापासून निघणार आहे. लिंगायत स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्या सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त अॅडवोकेट आर. एस. पाटील यांच्या आत्या होत्या.
