उर्दू दिनानिमित्त सोलापूर ' उर्दू घर ' मध्ये प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम
सोलापूर : मला उर्दू घरच्या माध्यमातून लोकांमध्ये उर्दूबद्दल प्रेमाची भावना जागृत करायची आहे, असे मत सोलापूर उर्दू घर आयोजित उर्दू वर्गाच्या समारोप समारंभात बोलताना उर्दू घरचे सांस्कृतिक समितीचे उपाध्यक्ष सदाशिव पडदुणे यांनी आपल्या भाषणात आपले मत व्यक्त केले.
गेल्या आठ महिन्यापासून सोलापूर उर्दू घरमध्ये उर्दू प्रशिक्षण वर्ग चालू होते. या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात उर्दू घरचे सांस्कृतिक समितीचे उपाध्यक्ष सदाशिव पडदुणे बोलत होते.
प्रारंभी उर्दू घरचे सदस्य डॉ. प्रा. मो. शफी चोबदार यांनी उपस्थितांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. उर्दू प्रशिक्षण वर्गात उर्दू अवगत केलेले विद्यार्थी महेंद्र भोसले, सोनी, आदिल शेख, जहाआरा सय्यद, जावेद शेख, डॉ. खलील जमादार, हाजी लियाखत शेख, अब्दुल रजाक शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मी उर्दू सांस्कृतिक समितीच्या उपाध्यक्ष या नात्याने उर्दू घरला तांत्रिकदृष्ट्या प्रबळ केलेला आहे. येत्या जूनपर्यंत उर्दू घर चं ग्रंथालय सुसज्ज होईल. हे उर्दू प्रशिक्षण वर्ग पुढेही असंच चालणार आहे. त्यांनी आवाहन केले की नागरिकांनी या उर्दू वर्गाचा लाभ घ्यावा, असं आवाहनही पडदुणे यांनी यावेळी केले.
यावेळी विचारपीठावर उर्दू घरचे सदस्य डॉ. मो. शफी चोबदार, मो. अयाज शेख, के. बी. नदाफ आदींची उपस्थिती होती.
उर्दू वर्गाचे शिक्षक अ. मजीद शेख यांनी उर्दू शिकवत असताना आलेल्या अनुभव व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्यावतीने उर्दू वर्ग शिक्षक अ. मजीद शेख यांना मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी उर्दू शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
सूत्रसंचालन उर्दू घरचे सदस्य मेहमूद नवाज यांनी केले तर उर्दू घरचे व्यवस्थापक राजा बागबान यांनी आभार मानले.यावेळी उर्दू घरचे सदस्य डॉ. हरून रशीद बागबान, आसीफ इकबाल, डॉ. सुमय्या बागबान, ग्रंथपाल साहीर नदाफ, मेहबूब कुमठे, अब्दुल मन्नान शेख, इक्बाल बागबान व इतर मान्यवर उपस्थित होते.

