महाशिवरात्री ! भुईकोट किल्ल्यामध्ये कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिरात सामुहिक आरती

shivrajya patra

दगडी नंदीची प्राणप्रतिष्ठापना; श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समितीचे आयोजन

सोलापूर  : भुईकोट किल्ल्यामध्ये असणाऱ्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराच्यासमोर महाशिवरात्रीचे औचित्य साधून पहिल्यांदाच पाषाणाच्या नंदीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच उपस्थित भक्तांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. नंदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि आरती असे शहरात पहिल्यांदाच झाले.

श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समितीच्यावतीने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी समितीचे संस्थापक अध्यक्ष विजय चोळ्ळे यांनी आणलेला दगडी नंदीचे श्री मल्लिकार्जुनाच्यासमोर ठेवण्यात आला. त्यानंतर कलय्या गणेचारी स्वामी यांनी पौरोहित्य करत या नंदीची प्राणप्रतिष्ठापना केली. सिद्धरामांची आणि मल्लिकार्जुनाची सामूहिक आरती करण्यात आली. अभिषेक आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समितीचे पदाधिकारी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, विजय बिराजदार, शेळगी येथील बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे गंगाधर झुरळे, योगीनाथ तुगांवकर, मनोज सलगर, मल्लिकार्जुन जेवरे यांच्यासह नंदकिशोर मिश्रा, नितीन कोल्हापुरे, शिवाजी काशीद, श्रीमती हब्बू, माधुरी विभूते यांच्यासह सिद्धरामेश्वर आणि श्री मल्लिकार्जुन भक्त उपस्थित होते.

मार्डी येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेच्या ६० विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. त्यांच्यासोबत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी होते. तसेच आलेल्या भक्तांनी सहकुटुंब येत प्रसाद व पूजेच्या सहित्याची सेवा बजावली.

To Top