सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामाजाचं ऋण फेडण्यासाठी संघटन कार्यात सक्रिय राहावं : अशोक दिलपाक

shivrajya patra

 

पुणे : सेवानिवृत्तीनंतर आपले उर्वरित बोनस आयुष्य सामाजिक कामाकरिता लाऊया, आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे काहीतरी देणे आहोत, ते ऋण फोडण्यासाठी सर्व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संघटन कार्यात सक्रिय राहावं, असं आवाहन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अशोक दिलपाक यांनी केले.

येथील ताडीवाला परिसरातील प्रायव्हेट रोड, नालंदा बुद्ध विहारात नियोजित " शाक्य संघ ," शौर्य विजयस्तंभ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था (पेन्शनर्स) यांची प्रथमच सामाजिक कार्याकरिता प्रथमच बैठक आयोजित करण्यात आली होती.

मंगळवारी, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी पार पडलेल्या बैठकीत प्रारंभी नालंदा बुद्ध विहाराचे चेअरमन सचिन कीर्ते, ज्येष्ठ सल्लागार झेड. बी. जगताप तसेच बौद्धाचार्य संदीप जावळे यांनी बुद्ध वंदना घेतली. त्यानंतर पुणे ग्रुपचे ग्रुप ॲडमिन सर्वगोड यांनी बैठक बोलावण्यामागील उद्देश प्रास्ताविकात स्पष्ट केला. नवनाथ अडसूळ यांनी त्यास अनुमोदन दिले. या मिटिंगमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, एस. आर. पी., रेल्वे पोलीस येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते. सर्व उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना मुख्य मार्गदर्शक अशोक दिलपाक बोलत होते.

महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने समाजात स्थान सक्षम झालेले पोलीस बांधव, बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्यावर कंबर कसून शाक्य संघाच्या माध्यमातून एकत्र आले असून सर्व उपस्थित आणि समाजासाठी वेळ द्यावा, पोलीस दलात असणारे बौद्ध पोलीस बांधव सेवानिवृत्त बौद्ध पोलीस बौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी शाक्य संघाची स्थापना केली आहे. या संघ राज्यातील सुमारे 27 जिल्ह्यात पसरला आहे. असं दिलपाक यांनी यावेळी म्हटले.

शासकीय संघाची सहा जिल्ह्यात रजिस्ट्रेशन झालेले आहे. शाक्य संघ हा राजकीय नसून संघात  भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा हेच ध्येय आहे, असेही मुख्य मार्गदर्शक अशोक दीलपाक यांनी सांगितले. 

या मिटिंगमध्ये सामाजिक विविध विषयावर आनंदमय वातावरणात चर्चा झाली. अशोक दिलपाक (नियोजित- "शाक्य" संघ‌‌‌ , संघटक, महाराष्ट्र) यांनी सेवानिवृत्तीनंतर आपण काही तरी सामाजिक कार्य करण्याची गरज आहे. त्याकरिता ज्या पोलीस खात्यातून आपण सेवानिवृत्त झालो आहे, त्याचे संघटन पुणे शहरात करून समाजातील समाजोपयोगी आपल्याला जी आवडतील व आपल्याला जी झेपतील अशी सामाजिक कामे आपण सर्वांच्या सहकार्याने करूया. 

पुणे शहरात आपल्या सामाजिक संघटनेची विशेष ओळख राहण्याकरता जास्तीत जास्त, विशेष ड्रेस कोड आपण सर्वजण शिवून महापुरुषांना आपण त्या ड्रेस कोडमध्ये सलामी देऊया, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या ज्या शासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याचा सर्वजण प्रयत्न करूया, हे संघटन वाढविण्याकरता सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहनही त्यांनी जमलेल्या सर्व बौद्ध उपासकांना आवाहन केले. मोठ्या संख्येने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी हजर होते. 

नालंदा बुद्ध विहार, प्रायव्हेट रोडचे चेअरमन सचिन कीर्ते आणि ज्येष्ठ सल्लागार झेड. बी. साबळे, बोधाचार्य संदीप जावळे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल किशोर साळवे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

यावेळी अर्जुन कांबळे, गोविंद जगताप, महेंद्र रणधीर, अनंतराव चिंचोलीकर, विजय सरवदे, किर्तीकुमार गायकवाड, रमेश निकाळजे, अनंता भालेराव, रमेश सोनवणे, फुलचंद वाघमारे, महादेव आठवले, भारत जंजाळ, बबन गायकवाड, अनिल सरोदे, हेमंत चोपडे, बाबासाहेब माने, सुभाष सर्वगोड आणि नवनाथ अडसूळ यांच्यासह अन्य सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

To Top