वेठबिगार बापाचा मुलगा बनला कारागृह पोलीस

shivrajya patra

सम्यक अकॅडमी च्या वतीने शिवजयंतीनिमित्त सत्कार

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील घोळसगव येथील अमोल अशोक गोगावे यांची मुंबई कारागृह पोलीस म्हणून निवड झालीय. अमोल यांचे वडील अशोक गोगावे हे लहानपणी वेठबिगारी करीत होते, परंतु बालपणी वेठबिगारी करणाऱ्या अशोक गोगावे यांचा मुलगा आता शासनाच्या पोलीस भरती परिक्षेतून मुंबई कारागृह पोलीस बनला. सोलापूरच्या सम्यक अकॅडमीमध्ये ते मोफत मार्गदर्शन घेत होते. या निमित्ताने अकॅडमीच्या वतीने अमोल गोगावे यांचा  सत्कार करण्यात आला.

मुंबई कारागृह पोलीस परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची निवड झाल्याने सम्यक अकॅडमीच्या वतीने शिवजयंती दिनी त्याचा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सम्यक अकादमीचे मार्गदर्शक अभियंता बुद्धजय भालशंकर, लोकराजा फाउंडेशनचे प्रमुख आशुतोष तोंडसे, सेवा फाउंडेशनच्या प्रमुख मनीषा वाघमारे, प्रा. पल्लवी मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बुद्धजय भालशंकर, मनीषा वाघमारे आणि समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी अमोल गोगावे याचे कौतुक करणारे तसेच शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले. यावेळी सम्यक अकडमी मधील स्पर्धा परीक्षा देणारे स्पर्धक उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशुतोष तोंडसे यांनी केले. सूत्रसंचालन भौरमा वाघमारे यांनी केले तर साक्षी सोनकांबळे हिने सर्वांचं आभार मानले.

To Top