... सर्वांच्या ऋणाची उतराई करण्यासाठी मी नक्कीच चांगले काम करेन : शिवश्री सखाराम साठे

shivrajya patra

सावळेश्वरच्या नुतन सरपंचपदी शिवश्री साठे यांची निवड

मोहोळ : संपूर्ण मोहोळ तालुक्याचं सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या मौजे सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंचपदी लोकनेते परिवाराचे शिवश्री सखाराम जालिंदर साठे यांची निवड झाली. सर्वांच्या ऋणाची उतराई करण्यासाठी मी नक्कीच चांगले काम करेन, असा विश्वास नुतन सरपंच शिवश्री सखाराम साठे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती मोहोळचे सभापती धनाजी गावडे व माजी पंचायत समिती सदस्य कालिदास गावडे यांनी सावळेश्वरमध्ये आजपर्यंत मराठा समाजाचा सरपंच झाला नाही, त्यामुळे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी दिलेला शब्द खरा करुन  समाजाला सरपंच पदाचा वाटा देऊन समाजापुढे एक सर्व धर्म समभाव निर्माण करुन तालुक्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी नुतन सरपंच सखाराम साठे यांनी, गावाने मला सरपंच पद देऊन खऱ्या अर्थांने, 'सर्व धर्म समभाव' अहिल्या राणीसाहेबांचा समतेचा आदर्श ठेवला आहे. गावाने टाकलेला माझावरचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवून दाखवेन, सर्वांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करेन, खरे तर एका उच्च शिक्षीत तरुणाला ही संधी दिली. लोकनेते परिवारानेही माझ्यावर विश्वास टाकला, या माझ्यासाठी जमेच्या बाजू आहेत, असंही शिवश्री साठे यांनी यावेळी म्हटले.

यावेळी माजी सरपंच पार्वती गावडे, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत गुंड, अर्जुन साबळे, कल्पना टेकाळे, सोनाली पैकेकरी, अनिता गावडे, कल्पना गावडे यांच्यासह तुकाराम शिंदे, लक्ष्मण वाघमोडे, दीपक गावडे, संतोष  साठे, श्रीकांत टेकाळे सर व ग्रामस्थ उपस्थित होते. 


To Top