शिवजयंतीदिनी 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे वाटप; संभाजी ब्रिगेडचा उपक्रम

shivrajya patra

वारकऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने मेकॅनिक चौक येथे वारकऱ्यांच्या हस्ते शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव विचारांची शिवजयंती साजरा करण्यात येत आहे. गाणगापूर ते आळंदी चालत वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या दोनशे प्रतींचे शिवभक्तांना वाटप करण्यात आले. 

यावेळी संभाजी ब्रिगेड चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, उपाध्यक्ष मनीषा कोळी, राजनंदिनी धुमाळ, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, ओंकार कदम, बबन डिंगणे, लखन पारसे, वैभव धुमाळ, आकाश नाईकवाडी, विकास सावंत आदी उपस्थित होते.

To Top