मुंबई : येथील वानखेडे गरवारे क्लब हाऊस येथे पद्मश्री शास्त्रीय गायिका सोमा घोष यांच्या हस्ते सोलापूर सुरमणी तथा महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहंम्मद अयाज यांना उत्कृष्ट गायक चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार पद्मश्री शास्त्रीय गायिका सोमा घोष व लातूर जिल्ह्याचे खासदार सुनिल गायकवाड यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जैन समाजाचे देवेंद्र बृहम्हचारी, मंजू मंगल प्रभात लोढा, शेमेराव्ऊ इन्टरटेनमेंट अध्यक्ष चे केतन मारु, तस्वीर फाऊंडेशनचे विजय माथूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मोहम्मद अयाज यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात देऊन एकलव्य सारखे आपल्या कलेची साधना केली. आई-वडील शेतकरी, कुटुंबाला संगीतचा कुठलाही वारसा नसताना, गुरे-ढोरे, शेळ्या-मेंढ्या राखत आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना जगभर पोहोचवले अन् मंगेशकर परिवाराने मोहम्मद अयाज यांची दखल महागायक म्हणून निवड केली.
अशा सोलापुरी कलावंताचा सन्मान सोहळा गरवारे क्लब हाऊस चर्च गेट मुंबई येथे नुकताच पार पडला. मोहम्मद अयाज यांनी या सन्मान सोहळ्यात मुंबईकरांचं आभार मानले.
फोटो मध्ये : पुरस्कार प्रदान करताना पद्मश्री सोमा घोष, खासदार सुनिल गायकवाड, बृहम्हचारीजी आणि गायक मोहम्मद अयाज